२०० रुपयांसाठी त्याने केली भावाची हत्या

भावाने पैसे चोरल्याचा राग अनावर झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना दिली कबूली

SHARE

अवघ्या २०० रुपयांसाठी भावानेच भावाची हत्या केल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. रमेश शेट्टी (२५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी मूर्ती शेट्टी याला पोलिसांनी अटक केली आहे. भावाने पैसे चोरल्याचा राग अनावर झाल्याने त्याने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

हेही वाचाः- आमचं अंतरंग भगवंच, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

वांद्रेच्या चामडावाडी परिसरात शेट्टी बंधू राहतात. छोटे मोठे काम करून ते उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री मूर्तीने त्याचे पैसे घरातल्या कपाटावर ठेवले होते. काही वेळाने तो ते पैसे घेण्यासाठी गेला असता. त्याला ते पैसे आढळून आले नाही. त्यावेळी रमेश घरी होता, त्यामुळे त्यानेच ते पैसे चोरल्याचा मूर्तीला संशय होता. रात्री ८ वा. रमेश हा चामडावाडी येथील वांद्रे जुने टर्मिनल्स येथे असल्याची माहिती मूर्तीला मिळाली.

हेही वाचाः-  'या' टिसी'ने रेल्वेला कमावून दिले कोट्यावधी रुपये

मूर्तीने वांद्रे टर्मिनल्स येथे रमेशला गाठत त्याला पैसे चोरल्याचा आरोप करू लागला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावेळी मूर्तीने रमेशला बघून घेण्याची धमकी देत कानशिलात वाजवली. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यावेळी मूर्तीने रमेशला मारहाण करत नाल्यात ढकलून दिले. त्यात तो जखमी झाला होता. त्याच्या मित्रांनी त्याला जवळील भाभा रुग्णालयात नेले. मात्र नाल्यात पडल्यावर त्याच्या डोक्याला मुक्कामार लागला होता. उपचारा दरम्यान रमेशचा मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले.

हेही वाचाः- देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निर्मलनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पोलिसांनी मूर्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत मूर्तीला अटक केली. गुरूवारी दुपारी मूर्तीला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात नेले असता. न्यायालयाने त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- मुंबईत पुन्हा झाडांची होणार कत्तल


संबंधित विषय
ताज्या बातम्या