Advertisement

आमचं अंतरंग भगवंच, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

आम्ही ४० वर्षे ज्यांच्याविरोधात राजकारण केलं, त्याच्यांसोबत उघडपणे गेलो असलो, तरी आमचा रंग आणि अंतरंग भगवेच असल्याचं मुख्यमंत्री आणि ​शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे​​​ यांनी सांगितलं.

आमचं अंतरंग भगवंच, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
SHARES

आम्ही ४० वर्षे ज्यांच्याविरोधात राजकारण केलं, त्याच्यांसोबत उघडपणे गेलो असलो, तरी आमचा रंग आणि अंतरंग भगवेच असल्याचं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं. गुरूवारी वांद्रे-कुर्ला संकुलात (bkc) आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेने (shiv sena) या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यात ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी (ncp) सोबत मिळून राज्यात महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून शिवसेनेने कडव्या हिंदुत्वाला मुरड घातल्याची टीका सातत्याने भाजपकडून होत आहे. त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपचा (bjp) चांगलाच समाचार घेतला. 

हेही वाचा- माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

भाजपने शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाचा (chief minister) शब्द दिला होता. पण हा शब्द पाळला नाही. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मी नुसता उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी घाबरणारा नसून लढणारा आहे. प्राण गेला तरी बेहत्तर पण खोटं बोलणार नाही. माझं कुटुंबिय शिवसैनिकांशी कधीही प्रतारणा करणार नाही. मी गप्प बसलो असतो, तर शिवसैनिकांना काय तोंड दाखवलं असतं? त्यामुळेच ४० वर्षे ज्यांच्याविरोधात लढलो त्यांना उघडपणे सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेची (shiv sena) सत्ता महाराष्ट्रात आणली. ना आमचा रंग बदलला, ना अंतरंग बदलले, शिवसेनेचा रंग भगवाच (shiv sena saffron) होता आणि भगवाच आहे, असा खुलासा ठाकरे यांनी केला.

जे आज शिवसेनेचा (shiv sena) खरा चेहरा उघड पडल्याची टीका करत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी (hindutva) शिवसेनेचा हात सोडून जाताना २०१४ मध्ये कुठल्या अदृष्य हाताची मदत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, ते आधी सांगावं. असा प्रश्न उपस्थित करत भाजपवर (bjp) टीका केली.

एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असं आश्वासन मी बाळासाहेबांना (bal thackeray) दिलं होतं. हे आश्वासन पूर्ण केल्याचं मला समाधान आहे. मी स्वत: मुख्यमंत्री होईल, असं कधीही ठरवलं नव्हतं. पण सरकार स्थापन करण्यासाठी हे आव्हान मला स्वीकारावं लागलं. त्यामुळेच माझं हे मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी घाम गाळणारे प्रसंगी रक्त सांडलेल्या शिवसैनिकांच्या (shiv sainik) चरणी अर्पण असल्याचं ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- शिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा