Advertisement

आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून तीन विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत.

आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन
SHARES

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून तीन विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत.  लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि पनवेल ( Panvel) हून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत. दरवर्षी आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून हजारो भावीक जात असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत. 

एलटीटी (Lokmanya Tilak Terminus)  ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) विशेष एक्स्प्रेस (Special Express) १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून  मध्यरात्री १.१० वाजता सुटणार आहे. ही एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. त्यानंतर ही एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघून एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी एलटीटी Lokmanya Tilak Terminus) ते थिवि विशेष एक्स्प्रेस एलटीटीहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) येथे पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी थिविहून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५५ वाजता सुटणार आहे. ही ट्रेन एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानLokmanya Tilak Terminus) कांवर थांबा देण्यात येईल.

 आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे. मालवणमधील  (Malvan) आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा (Bharadidevi Jatra) ही अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे. दीड दिवसाच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी फक्त कोकणवासीय नव्हे तर देशा-परदेशातील श्रद्धाळू भाविक उत्सुक असतात. त्यामुळे देवीचा कौल लावून काढली जाणारी भराडी देवीच्या यात्रेबाबत मोठी उत्सुकता असते.

  •  सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Jatra) आता मुंबई (mumbai) मधून ती विशेष एक्स्प्रेस (Special Express) सोडण्यात येणार आहेत.
  •  लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि पनवेल ( Panvel) हून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत. 
  • आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे.
  • दीड दिवसाच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी फक्त कोकणवासीय नव्हे तर देशा-परदेशातील श्रद्धाळू भाविक उत्सुक असतात. 




हेही वाचा -

तेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा

महिलांना रेल्वे जवान सोडणार घरापर्यंत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा