माटुंग्यात ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण

पीडित मुलगी ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत होती. तिच्या शेजारी तुटलेल्या विटा आढळून आल्या, आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

माटुंग्यात ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण
SHARES

माटुंग्यात रस्त्यावर कुटुंबियांसोबत झोपलेल्या सहा वर्षीय मुलीचे अपहण झाल्याची घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली आहे. ही चिमुरडी काही तासांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या शांतीबूवन येथील पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. मुलीवर आरोपीने लैगिक अत्याचार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः-दोनशे रुपयांसाठी त्याने केली भावाची हत्या

पीडित सहा वर्षीय मुलगी श्रद्धानंद रोडवर आपल्या कुटुंबियांसोबत झोपली होती. पहाटे मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिच्या पुढ्यात मुलगी आढळून न आल्याने ती मुलीचा शोध घेऊन लागली. मात्र आसपास परिसरात ही ती कुठे न दिसून आल्याने कुटुंबियांनी नियंत्रण कक्षाला फोन लावत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेत, मुलीचा शोध सुरू केला. कालांतराने पीडित मुलगी काही अंतरावर असलेल्या शांतीनाथ भूवन येथील पदपथावर जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिला तात्काळ जवळील लोकमान्य टिळक शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

 हेही वाचाः- आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून ३ विशेष ट्रेन

पीडित मुलगी ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत होती. तिच्या शेजारी तुटलेल्या विटा आढळून आल्या, आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा माग काढत आहेत.

  हेही वाचाः- देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

Read this story in हिंदी
संबंधित विषय