मंत्रालय कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशातील विविध कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी या दोन दिवस संपूर्ण देशभरात संपाची हाक दिली असून या संपात आता मंत्रालयातील कर्मचारीही उतरले आहे. मंगळवारी दुपारी २.१५ च्या सुमारास मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी गेटसमोर कामबंद आंदोलन पुकारलं अाहे. जवळपास २ हजारपेक्षा जास्त कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. 

मागण्या काय?

राज्याचे मंत्रालय कर्मचारी केंद्राप्रमाणे सर्व नियम पाळत असून केंद्रीय सचिवालयातील लिपिकांप्रमाणे मंत्रालयातील लिपिक टंकलेखक यांना २४०० ग्रेड वेतन देण्यात यावं, अंशदायी पेन्शन धारकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करून सेवा निवृत्तीचं वय ६० करावं, रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करूऩ पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी देण्यात यावी यांसह इतर मागण्यांसाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आहे.

 

बैठक सुरू 

कर्मचाऱ्यांनी गेटसमोर आंदोलन पुकारलं असून शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा धिक्कार केला आहे. सध्या या सरकारी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. 


हेही वाचा -

मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस संपाचा, महत्त्वाच्या सेवा बंद

मुंबईकर बेहाल, सकाळपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर नाही


पुढील बातमी
इतर बातम्या