Advertisement

मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस संपाचा, महत्त्वाच्या सेवा बंद


मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस संपाचा, महत्त्वाच्या सेवा बंद
SHARES

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशातील विविध कामगार संघटनांनी ८ आणि ९ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय संपाची हाक दिली आहे. या संपात सार्वजनिक बँका, विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग, अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षाचालक, बांधकाम मजूर इत्यादी संघटना सहभागी अाहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस संपाचा ठरणार आहे. तर मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट च्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संपाची हाक दिली असल्यानं मुंबईकराची चांगलीच गैरसोय होणार आहे. 


प्रमुख मागण्या

नियमित स्वरूपाच्या कामासाठी कंत्राटी पद्धत बंद करावी. कंत्राटी कामगारांना कायम करावे. 'नीम' योजनेखाली नियमित उत्पादनाचे काम करून घेण्याची प्रथा बंद करावी. कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी बदल रद्द करावेत. संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकरी श्रमिकांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून निवृत्तीनंतर दरमहा ३००० निवृत्तीवेतन द्यावे. बोनस, भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी कमाल वेतन मर्यादा रद्द करावी. अंगणवाडी, आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा, तसंच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक धोरणाचा अवलंब करावा, बेरोजगार भत्त्याचीही तरतूद करावी यांसह इतर मागण्या कामगार संघटनांतर्फे करण्यात आल्या आहेत. 


संपात सहभागी कोण?

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं असून देशभरातील केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, महामंडळे आणि कंपन्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून बेस्टचे कर्मचारी संपावर गेल्यानं रस्त्यावर बेस्टची एकही बस धावताना दिसत नाही. त्याशिवाय सार्वजनिक बँका, विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग यानीही संप पुकारला आहे. 

त्याशिवाय अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षाचालक, बांधकाम मजूरांनी संप पुकारलं आहे. विशेष म्हणजे या संपात बेस्ट, वीज कर्मचारी, बँका, महापालिका कर्मचारी, औषध विक्रेते, रिक्षाचालकांचेही काम बंद असल्यानं असंख्य मुंबईकर वेठीस धरले गेले आहेत.



हेही वाचा

मुंबईकर बेहाल, सकाळपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर नाही

एसटी आली धावून! प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या ४० गाड्या




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा