मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई आणि उपनगरातील तापमान वाढ कायम असून मंगळवारी पुन्हा २ ते ३ अंशाची वाढ झाली. उपनगरातील कमाल तापमानात वाढ होत असल्याने दिवसा उकाडा वाढला आहे.

पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल आणि किमान दोन्ही तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

उपनगरातील किमान तापमान शुक्रवारी १५ अंशाखाली घसरले होते. मोसमातील हे सर्वात कमी तापमान नोंदले होते. मात्र, शनिवारपासून त्यामध्ये वाढ होत असून मंगळवारी सांताक्रूझ इथं १९.२ अंश, तर कुलाबा इथं २२.० अंश किमान तापमान नोंदविण्यात आले.

उपनगरातील कमाल तापमानात गेल्या ४ दिवसांत सुमारे ५ ते ६ अंशाची वाढ झाली आहे. मंगळवारी सांताक्रूझ इथं ३६.३ अंश, तर कुलाबा इथं ३३.८ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले.


हेही वाचा -

लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू - राजेश टोपे

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘ईडी’ची नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या