ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘ईडी’ची नोटीस


ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘ईडी’ची नोटीस
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या सासू गौरी भोसले या ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गौरी भोसले यांची नुकतीच मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. परदेशात खरेदी केलेल्या मालमत्तेची विचारपूस करण्यासाठी गौरी भोसले यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी या नोटीशीबाबात काहीही बोलणं टाळलं.

गौरी भोसले यांच्या अकाऊंटमधून परदेशात अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या अकाऊंट काही पैसेही परदेशात पाठवण्यात आले होते. याप्रकरणी गौरी भोसले यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे अविनाश भोसले यांच्या मालमत्तेबाबत ईडी चौकशी करत आहे. या आधी २७ नोव्हेंबर २०२० या दिवशी ईडीने भोसले यांची जवळपास १० तास चौकशी केल्याचे सांगण्यात आले होते. फेमा (FEMA) कायद्यांद्यांतर्गत ही चौकशी केली गेली असे त्यावेळी सांगिण्यात आले.

 हे प्रकरण अद्यापकही कायम आहे. आयकर विभागानेही भोसले यांच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. आयकर विभागाने भौसले यांच्या पुणे आणि मुंबई येथील सुमारे २३ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते. दरम्यान, ईडी आणि आयकर विभागाने या आधी महाविकासाआघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांना त्यांच्या कुटुंबीय आणि संबंधितांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली होती. याशिवाय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही अनेक नेत्यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा