ग्रँट रोड पुलावर तात्पुरती मलमपट्टी, नागरिक संतप्त

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • सिविक

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड स्टेशन जवळील उड्डाणपूलाला तडे गेल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पुलाची महापालिकेतर्फे तात्पुरती डागडुजी करण्यात आली. अाता हा पूल खुला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

मध्यरात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलाला तडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर सकाळी पोलिस, रेल्वे, व महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर लगेचच सुरक्षिततेच्या दृष्टीनं पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खबरदारी म्हणून ही वाहतूक नाना चौकातून केनेडी पुलावरून वळवण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला होता.

डांबर, खडी टाकून दुरूस्ती

 पुलावरील तडे गेलेल्या ठिकाणी खड्डे पाडून त्यावर डांबर आणि खडी टाकण्यात अाली. प्रत्येक तडे गेलेल्या ठिकाणी अशाच प्रकारे डांबरीकरण करून भरण्यात येत असल्यानं त्यावर फक्त तात्पुरते मलमपट्टी करण्याचं काम पालिका प्रशासन करत असल्याचं दिसून येत आहे. जर येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आणि अंधेरीच्या पुलाप्रमाणे हा पूलही कोसळल्यानंतरच सरकारला जाग येणार का, अशा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

या पुलाला पूर्णत: तडे गेल्यानं हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. तर पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून नंतरच त्याची डागडुजी करावी. ही डागडुजी करण्याची संयुक्तरित्या जबाबदारी पालिका व रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता सर्व पुलांची देखभाल करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत अाहेत.

 महापालिकातर्फे या पुलावर पडलेल्या भेगांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत अाहे. मात्र, मुसळधार पावसात हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे, हे सर्वांसमोर येईलच.

 - निलेश शिरधनकर, मनसे शाखाप्रमुख, ग्रॅँट रोड


हेही वाचा -

अंधेरी ते चर्चगेट वाहतूक दिवसभर राहणार बंद 

खूशखबर! पुरूषांनाही मिळणार १८० दिवसांची बालसंगोपन रजा


पुढील बातमी
इतर बातम्या