Advertisement

खूशखबर! पुरूषांनाही मिळणार १८० दिवसांची बालसंगोपन रजा

मुलांच्या पालन पोषणासाठीही महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची भरपगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. तर बायकोचं निधन झालेल्या पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी १८० दिवसांची पगारी रजा देण्यात येणार आहे.

खूशखबर! पुरूषांनाही मिळणार १८० दिवसांची बालसंगोपन रजा
SHARES

सर्व राज्य सरकारी महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांना शासनाने बुधवारी खूशखबर दिली. प्रसूती रजेननंतर आता मुलांच्या पालन पोषणासाठीही महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची भरपगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. तर बायकोचं निधन झालेल्या पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी १८० दिवसांची पगारी रजा देण्यात येणार आहे.


शालांत परीक्षेसाठी उपयोग

या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना १० वी किंवा १२ वीच्या परीक्षेच्या काळांत मुलांना वेळ देता येणार आहे. महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांना ही रजा विभागूनही घेता येणार असून एका वर्षात जास्त जास्त ३ वेळेस ही रजा घेता येईल.


काही दिवसात होणार लागू

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय लवकरच लागू होणार आहे. पुढील काही दिवसांत या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.



हेही वाचा-

मुलगा गेल्याचं दुःख न करता केलं नेत्रदान

वाडिया रुग्णालयात विकलांगांसाठी सेंटर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा