Advertisement

वाडिया रुग्णालयात विकलांगांसाठी सेंटर


वाडिया रुग्णालयात विकलांगांसाठी सेंटर
SHARES

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये ०-१९ या वयोगटातील ६ लाख २६ हजार ८०९ मुले विकलांग आहेत. मात्र, महाराष्ट्रात विकलांग मुलांसाठी खूपच कमी सेवा केंद्र आहेत. विकलांग मुलांच्या सक्षमीकरणासाठी बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात सेंटर फॉर एम्पॉवरमेंट ऑफ चिल्ड्रन विथ डिसअॅबिलिटीज (सीएसीडव्ब्यूडी) हे केंद्र उभारण्यात आलं आहे.


मुंबईमधील पहिलेच सेंटर

हेलन केलर या जन्मतः बधिर आणि अंधत्व होत्या. त्यावर मात करून त्यांनी कला शाखेत पदवी संपादन केली. त्या अमेरिकेमध्ये लेखिका, राजकीय कार्यकर्त्या व उत्तम वक्त्या देखील होत्या. हेलन केलर यांच्या स्मरणार्थ सीएसीडव्ब्यूडी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विकलांग मुलांसाठी अशा प्रकारचे सेंटर एनजीओमध्येच कार्यरत असते.  पण मुलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे सेंटर वाडिया बाल रुग्णालयात उभारण्यात आले आहे. विकलांग मुलांसाठीचे हे मुंबईमधील पहिलेच सेंटर आहे


सर्वोत्तम रुग्णालयाचा पुरस्कार

बी. जे. वाडिया बालरुग्णालयाला आशियातील सर्वोत्तम रुग्णालयाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या रुग्णालयात प्रख्यात बालरोगतज्ज्ञ मुलांना वैद्यकीय सेवा देतात. मुलांसाठी सर्वोत्तम पुनर्वसनात्मक सेवा येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमांमध्ये ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओ थेरपी, स्पीच थेरपी आदी उपचारपद्धतींचा समावेश आहे.


 बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मुलांना विकलांगत्वाचा सामना करावा लागतो आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाडीया बालरुग्णालयात वर्षाला सरासरी ८००-१०० लहान मुले विकलांगतेच्या समस्येसह येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विकलांगतेने घातलेल्या मर्यादा पार करण्यास त्यांना सक्षम करण्यासाठी आम्हाला सीईसीडब्ल्यूडीची स्थापना करणं अपरिहार्य होतं.
 - डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय



हेही वाचा -

सेंट जाॅर्जेसमध्ये पार पडली पहिली 'मिरर हँड सर्जरी'

शिक्षण एमबीबीएस.... पण पगार सहा हजार रुपये; डॉक्टर्स डे स्पेशल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा