SHARE

भांडुप येथील फ्लायओव्हरवर दोन दिवसांपूर्वीच एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये निहार गोळे आणि त्याचा मित्र यश चौघुले या तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. आपला मुलगा या जगात नाही याचं दुःख न बाळगता निहारचे डोळे दान करण्याचा त्याच्या आई - वडिलांच्या निर्णयानं मात्र सगळेच भारावून गेले.


चिमुरडीला डोळे

२१ वर्षीय निहार गोळे याने हा ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात मास मीडियाचे शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर निहारने अभिनयक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमध्ये राहणारे निहारचे वडील प्रमोद गोळे हे एअर इंडियाचे निवृत्त अधिकारी आहेत. तर आई ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. निहारची भटकंती आणि नवनवीन ठिकाणी भेट देण्याची अावड होती. 

मरणोत्तरदेखील त्याच्या डोळ्यांनी इतर लोक जग पाहू शकतील यासाठी निहारच्या आई - वडिलांनी त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. निहारचे डोळे हे ५ वर्षीय मुलीला आणि ४७ वर्षीय पुरुषाला दान केले आहे, अशी माहिती भांडुप आय बँकेने दिली आहे


निहारला भटकंतीची आवड

अभिनयामध्ये रुची असलेला निहारला भटकंतीची प्रचंड आवड होती. भटकंतीसोबतच त्याला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची आवड देखील होती असं निहारच्या नातेवाईकांनी सांगितलं.हेही वाचा -

सेंट जाॅर्जेसमध्ये पार पडली पहिली 'मिरर हँड सर्जरी'

वाडिया रुग्णालयात विकलांगांसाठी सेंटर 

संबंधित विषय
ताज्या बातम्या