एसटीची सेवा लोकोपयोगी, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर आता निर्बंध येणार!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळा(एसटी)चे कर्मचारी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करतात. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो, प्रवासी सेवेवर परिणाम होतो. आता मात्र एसटीची सेवा सातत्यानं सुरू राहणार असून कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर निर्बंध येणार आहेत. कारण एसटी महामंडळाने आता एसटीचा सामावेश लोकोपयोगी सेवेत केला आहे. यासंबंधीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.

आंदोलनावर निर्बंध

या अध्यादेशानुसार १२ ऑक्टोबर २०१८ पासून पुढील सहा महिन्यांसाठी एसटीला लोकोपयोगी सेवा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही मागणीसाठी कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन किंवा संप करता येणार नाही. तर कोणत्याही कारणांने एसटीची सेवा बंद पडल्यास त्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असणार आहे.

एसटीची सेवा सातत्याने राहणार सुरू

या निर्णयामुळे एसटीची सेवा सातत्याने सुरू राहण्यास मदत होणार आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. कुठलाही संप, बंद बेकायदेशीरच असतो. मेस्मा लावला तरी संप होतो. त्यामुळे असा निर्णय घेतला तरी न्याय मागण्यासाठी कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली तर ते होईलच, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


हेही वाचा - 

खूशखबर! एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट आणि बरंच काही

ऐतिहासिक ट्राम पुन्हा येणार मुंबईकरांच्या भेटीला !

पुढील बातमी
इतर बातम्या