Advertisement

दिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)ने दिवाळीच्या काळासाठी एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या २० दिवसांदरम्यान तिकीट दरांमध्ये १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

दिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ
SHARES

दिवाळीत एसटीने गावी किंवा पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला थोडी खार लागू शकते. कारण दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)ने दिवाळीच्या काळासाठी एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या २० दिवसांदरम्यान तिकीट दरांमध्ये १० टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं मंगळवारी एसटी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.


फेऱ्या वाढवल्या

दिवाळीत शाळांना मोठी सुट्टी असते. त्यामुळे गावी वा पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातही एसटीने प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असल्याने दिवाळीदरम्यान प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळेच एसटीकडून दिवाळीदरम्यान गाड्यांची आणि फेऱ्यांची संख्या वाढवली जाते. यंदाही ९००० हून अधिक फेऱ्या दिवाळीसाठी वाढवण्यात आल्या आहेत.


हंगामी भाडेवाढ

मात्र त्याचवेळी दिवाळीच्या काळात अर्थात फक्त दिवाळीसाठी एसटीकडून भाडेवाढ केली जाते. हंगामी महसूल वाढीच्या नावाखाली ही भाडेवाढ केली जाते. त्यानुसार यंदा १० टक्क्यांची भाडेवाढ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरसाठी करण्यात आली आहे. ही भाडेवाढ झाल्यानं प्रवाशांना तिकीटासाठी १० टक्के अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.


४२ कोटींचा निधी

गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटीनं साधी-रातराणी बससाठी १० टक्के, निमआरामी बससाठी १५ टक्के तर वातानुकूलित बससेवेसाठी २० टक्के अशी भाडेवाढ केली होती. या भाडेवाढीतून २०१५ मध्ये ३६ कोटी तर २०१६ मध्ये ४२ कोटींचा निधी मिळाला होता. २०१७ मध्येही चांगला महसूल एसटीनं पदरात पाडून घेतला होता.


सरसकट भाडेवाढ

दरम्यान यंदा २०१८ मध्ये ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ प्रस्ताव होता. तर बस सेवेच्या प्रकारानुसार १०,१५ आणि २० टक्के वाढीचा प्रस्ताव होता. पण अशी भाडेवाढ न करता सरसकट १० टक्के भाडेवाढ करत प्रवाशांना दिलासा दिला आहे. ही दरवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.



हेही वाचा-

'महालक्ष्मी जत्रे'साठी बेस्टच्या जादा बस

आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा