
दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यंदाही 'महालक्ष्मीच्या जत्रे'साठी बेस्ट उपक्रमाकडून जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'महालक्ष्मीच्या जत्रे'साठी भाविक मोठ्या प्रमाणत गर्दी करत असतात. हे लक्षात घेता १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या नवरात्रोत्सवाच्या काळात एकूण २२ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
३३, ३७, ५७, ७७, ८३, १२४, १५१, ३५७ आणि महालक्ष्मी विशेष - ८११२ या बस मार्गावर जादा बसगड्या सोडण्यात येणार आहेत.
| बस क्र. | पासून | पर्यंत | वेळ |
|---|---|---|---|
| ३३ | पंडित पलुस्कर चौक | गोरेगाव बस स्थानक | ०६.४५ - २३०० |
| ३७ | जे. मेहता मार्ग | कुर्ला स्थानक (प.) | ०६.०० - २३.०० |
| ५७ | वाळकेश्वर | प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) | ०६.३५ - २२.४५ |
| ७७ | भायखळा स्थानक (प.) | ब्रीच कँडी रुग्णालय | ०५.३० - ००.३० |
| ८३ | कुलाबा बस स्थानक | सांताक्रूझ आगार | ०.३५ - २२.५० |
| १२४ | कुलाबा बस स्थानक | वरळी आगार | ०६.३६ - २३.०० |
| १५१ | वडाळा आगार | महालक्ष्मी मंदिर | ०७.३० - २२.३० |
| ८११२ | प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) | महालक्ष्मी मंदिर | ०७.०० - २१.३० |
त्याच प्रमाणे, प्रवाशांच्या मदतीसाठी वत्सलाबाई चौक (हाजीअली), वसंतराव नाईक चौक (ताडदेव), जे मेहता मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (प.), महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि महालक्ष्मी मंदिर या बसथांब्यावर बस निरीक्षकांची तसंच अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत
