Advertisement

आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत...!


आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत...!
SHARES

महाराष्ट्राच्या आजी-माजी विधिमंडळा (विधानसभा/परिषद) च्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत मिळाली आहे. ही घोषणा परिवहन आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक सोमवारी निर्गमित करण्यात आली आहे.


आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत जे व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आलेले आहेत, अशा आजी, माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या कोणत्याही प्रकारच्या बसमधून (अश्वमेध, शिवनेरी,शिवशाही, हिरकणी आणि परिवर्तन) महाराष्ट्र आणि आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे.

या प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्यांकडे विधानमंडळ सचिवालयानं पुरवलेलं ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांनी सर्व सामान्यांच्या हक्काच्या दळणवळणाचं साधन असलेल्या एसटी मधून प्रवास केल्यास त्यातून सकारात्मक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल.

लोकप्रतिनीधी एसटीनं प्रवास करतात का? असा सवाल विचारत नाराजी व्यक्त केली आहे. एसटी तोट्यांमध्ये चालत असताना आजी/माजी सदस्यांना मोफत प्रवास उपलब्ध करून देणं म्हणजे चुकीचं आहे. त्यामुळं त्याच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करणे योग्य नाही
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा