Advertisement

खूशखबर! एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट आणि बरंच काही

समितीचा अहवाल येण्याआधीच अंतरिम वेतनवाढ म्हणून १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

खूशखबर! एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट आणि बरंच काही
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)च्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात असणार आहे. एसटी अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट देण्यात आली असून १० टक्के इतकी अंतरीम वेतनवाढ तसंच महागाई भत्यात वाढ देण्यात आली आहे. त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांनाही २५०० रूपये दिवाळी भेटीबरोबरच पगारवाढीच्या मागील थकबाकीतील ५ हप्त्यांची रक्कम १ नोव्हेंबरला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.


अहवाल येण्याआधीच वेतनवाढ

काही महिन्यांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली होती. याच धर्तीवर एसटीच्या अधिकाऱ्यांनाही वेतनवाढ देण्याची मागणी होती. त्यानुसार अधिकाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी मंत्रालायतील २ निवृत्त अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीचा अहवाल येण्याआधीच अंतरिम वेतनवाढ म्हणून १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. आॅक्टोबर २०१८ पासून ही अंतरिम वेतनवाढ लागू होत असून ही वेतनवाढ प्रत्यक्षात मात्र समितीच्या अहवालानंतरच लागू होणार असल्याचंही रावते यांनी स्पष्ट केलं आहे.


थकबाकी एकत्रित मिळणार

पगारवाढीतील ५ हप्त्यांची थकबाकी एकत्र मिळणार आहे आणि तीही एेन दिवाळीत. तर त्याचवेळी २५०० रूपयांची दिवाळी भेटही कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळं आता आमची दिवाळी खरंच प्रकाशमय होणार असून एसटी प्रशासन आणि मंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बर्गे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांनी दिली आहे.



हेही वाचा-

दिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ

मुंबईतील पाच एसटी बस थांबे कात टाकणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा