वरळी समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या वरळी येथील समुद्रात साडेबारा नाॅटीकल माइल अंतरावर 'टग रेवती' नावाची बोट बुडल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तटरक्षक दलाने दाखल होऊन तातडीनं बचावकार्याला सुरुवात केली. त्यामुळे बोटीतील ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून एक प्रवासी बेपत्ता आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात येत आहे.

६ जण सुरक्षित एक बेपत्ता

वरळीच्या समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने अमर्त्या बोटीच्या मदतीने बुडालेल्या बोटीतील प्रवाशांना वाचवण्याची मोहीम हाती घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर बोटीतील ६ जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. तसंच, सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. मात्र या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे.


हेही वाचा -

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका

राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र


पुढील बातमी
इतर बातम्या