राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरीता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्रांचं वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. नव्यानं ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार आहे.

SHARE

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरीता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्रांचं वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. नव्यानं ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचं घरपोच वाटप करण्यात आलं आहे.

यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेलं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र देण्यात येत होतं. परंतु आता रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड  ओळखपत्र देण्यात येणार आहे. मतदारांनी रंगीत ओळखपत्रासाठी अर्ज केल्यास केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन हे नवीन ओळखपत्र देण्यात येईल.


बारकोडचा समावेश

आतापर्यंत सुमारे ४६ लाख मतदारांसाठी नवीन ओळखपत्र तयार करण्यात आलं आहे. नवीन ओळखपत्रासाठी अर्ज केलेल्या ९८ टक्के मतदारांना रंगीत ओळखपत्र देण्यात आली आहेत. या ओळखपत्रावर मतदाराचं नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळं बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे.


ईपीक कार्ड नसल्यास

इपिक कार्ड मिळालं नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी ओळखपत्र मिळण्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसंच मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर ओळखपत्र मिळण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे.हेही वाचा -

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा सोडतीला आचारसंहितेचा फटका

ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील पाण्याच्या टाकीत ५ कामगार पडले, एकाचा मृत्यू

संबंधित विषय
ताज्या बातम्या