Advertisement

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका

मुंबई, पुणे आणि नाशिकच्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीला राज्यात लागू झालेल्या आचारसंहितेमुळं विलंब होणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका
SHARES

मुंबई, पुणे आणि नाशिक येथील म्हाडाच्या  सोडतीला लोकलसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं विलंब होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळं या सोडतीसाठी अर्ज भरलेल्या इच्छुकांना हक्काच्या घरासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.


२३ मे नंतर सोडत

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे म्हाडाच्या मुंबई, पुणे आणि नाशिकमधील घरांची सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. देशात ७ टप्प्यांत (११ एप्रिल ते १९ मे), तर महाराष्ट्रात ४ (११ एप्रिल ते २९ मार्च) टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही सोडत आचारसंहिता संपल्यावर म्हणजेच २३ मे नंतर होणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांसह मुंबई व कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात ३ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसंच ७ मार्चपासून घरीं नोंदणी सुरू करण्यात आली होती. अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल आहे.


चेंबूरमध्ये १७० सदनिका

अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूरमधील शेल टॉवर येथील इमारतीत १७० सदनिका आहेत. त्यांची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख ३३ हजार इतकी असेल. तसंच सहकारनगरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी एक आणि पवईत ४६ सदनिका असतील.

मुंबईसोबत नाशिकमध्ये ३ एप्रिल रोजी ११३३ घरांसाठी आणि पुण्यात ३ मे रोजी लाॅटरीची सोडत होणार होती.




हेही वाचा -

दादर पश्चिम स्थानकातील दक्षिण पुलाचा रॅम्प आणि जिने बंद

लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मनसेचं स्पष्टीकरण




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा