Advertisement

दादर पश्चिम स्थानकातील दक्षिण पुलाचा रॅम्प आणि जिने बंद

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दादर स्थानकातील दक्षिण दिशेच्या पुलाची पाहणी केली असता, या पाहणीमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दादर स्थानकाबाहेरील या पुलाचा रॅम्प आणि स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ वर उतरणारा जिना रविवारी बंद करण्यात आला आहे.

दादर पश्चिम स्थानकातील दक्षिण पुलाचा रॅम्प आणि जिने बंद
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावरील पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दादर स्थानकातील दक्षिण दिशेच्या पुलाची पाहणी केली असता, या पाहणीमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दादर स्थानकाबाहेरील या पुलाचा रॅम्प आणि स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ वर उतरणारा जिना रविवारी बंद करण्यात आला आहे. 


महत्त्वाचं स्थानक

दादर स्थानक हे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या थांबत असल्याने दादर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याशिवाय पश्चिम रेल्वेने पाहणीदरम्यान बंद केलेला दक्षिण दिशेचा पूल हा दादरच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडत असल्यामुळं या पुलावर नेहमीच प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.


प्रवाशांच्या त्रासात भर

या पुलाचा रेल्वे स्थानकावर उतरण्यासाठी अनेक प्रवाशांकडून वापर करण्यात येतो. तसंच, दादर पश्चिम स्थानकाबाहेर असलेल्या या पुलाच्या पायऱ्यांचा देखील चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वापर होतो. मात्र, काही प्रवाशांना शिड्या जडणे व उतरणं शक्य नसल्यानं ते पुलाच्या रॅम्पचा वापर करतात. मात्र, हा रॅम्प सुद्धा दुरुस्तीकरीता बंद करण्यात आल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा वापर करावा लागत आहे. अशाताच, हा पूल रविवारीच बंद केल्यानं प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.


दुरुस्तीसाठी ९० दिवस

दरम्यान, हा पूल बंद असल्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहचावी यासाठी स्थानकाबाहेर पूल बंद असल्याचा बॅनर लावण्यात आला असून, स्थानकात पूल बंद असल्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात येत आहे. तसंच, या पुलाच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी १३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर,पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ९० दिवस लागणार आहेत.



हेही वाचा -

बीकॉम सत्र ६ ची हॉलतिकीट उपलब्ध

आगामी लोकसभा निवडणुक मनसे लढणार नाही, मनसेचे स्पष्टीकरण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा