बीकॉम सत्र ६ ची हॉलतिकीट उपलब्ध

येत्या ३ एप्रिलपासून बीकॉम सत्र ६ ची परीक्षा सुरू होत असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ५७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची हॉलतिकीट (प्रवेशपत्र) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बीकॉम सत्र ६ ची हॉलतिकीट उपलब्ध
SHARES

येत्या ३ एप्रिलपासून बीकॉम सत्र ६ ची परीक्षा सुरू होत असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ५७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची हॉलतिकीट (प्रवेशपत्र) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे परीक्षेच्या २० दिवस आधी हॉलतिकीट देण्याची विद्यापीठाची ही पहिलीच वेळ आहे.


मोबाईल अॅप वर उपलब्ध 

जवळपास ५७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे देण्यात आली असून, प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांच्या ई-सुविधाच्या लॉगिनमध्ये, तसेच कॉलेजच्या लॉगिनमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचबरोबर ई-सुविधाच्या मोबाईल अॅप वर देखील विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये हॉलतिकीट उपलब्ध केली आहेत. 


हॉलतिकीट दुरुस्ती

विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर प्रवेशपत्रावरील इंग्रजीतील नाव, मराठीतील नाव, आईचे नाव व विषय काळजीपूर्वक तपासावे. तसेच स्वतःचं छायाचित्र व स्वाक्षरी देखील पहावी. कारण अनेक विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी ही प्रथम वर्षात प्रवेश घेतानाची असते. त्यामुळे त्याचा व्यक्तिगत तपशील, छायाचित्र व स्वाक्षरी यात तीन वर्षांनतर बदल होण्याची शक्यता असते. तसंच नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मराठी नाव तसंच विषयातही बदल असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत तपशील, मराठीतील नाव, छायाचित्र व स्वाक्षरी या सर्व माहितीचा उपयोग विद्यापीठ गुणपत्रिका, पदवी, प्रमाणपत्रे व विविध प्रमाणपत्रे यावर करीत असल्यानं या तपशिलात दुरुस्ती करणं आवश्यक आहे. 

विद्यार्थ्याला यात दुरूस्ती करायची असेल, तर त्याबाबतची विनंती विद्यार्थ्याला कॉलेजकडे करावी लागणार आहे. आणि त्यानंतर याबाबतचा सविस्तर तपशील विद्यापीठाकडे २० मार्चपूर्वी पाठवणं गरजेचं असणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना बीकॉम सत्र ६ परीक्षेच्या हॉलतिकीटवर बीकॉम सत्र ५ चे परीक्षा केंद्र देण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांचा ऐनवेळी परीक्षा केंद्र शोधण्यास वेळ वाचणार आहे. 


प्रथमच विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी २० दिवस आधी परीक्षेची प्रवेशपत्रे देत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यास प्रवेश केंद्र शोधण्यास तसेच त्या प्रवेशपत्रावर एखादी दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. इतर परीक्षांचेही प्रवेशपत्रे परीक्षेपूर्वी लवकरच देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. 

-डॉ सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठहेही वाचा -

‘ही’ आहेत हिमालय पूल पडण्याची कारणं

Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोलासंबंधित विषय