ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील पाण्याच्या टाकीत ५ कामगार पडले, एकाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम करत असताना पाच कामगार तोल जाऊन टाकीत पडल्याची घटना ग्रँट रोडमधील नाना चौकात घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतं.

SHARE

पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम करत असताना पाच कामगार तोल जाऊन टाकीत पडल्याची घटना ग्रँट रोडमधील नाना चौकात घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतं. या घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसंच, बाकीच्या चार कामगारांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 


आयसीयूमध्ये उपचार

या घटनेमध्ये ४० वर्षीय राकेश निजाब यांचा नायर रुग्णालयात दाखल मृत्यू झाला. तर, उमेश पवार (४२), शांताराम भाकटे (४७), सुरेश पवार (४२) आणि बाळासाहेब भावरे (४७) या चार कामगारांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


दुरुस्तीचं काम

ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ असलेल्या नाना चौकात शनिवारी रात्रीच्या सुमारास हे पाचही कामगार पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करत होते. काम करत असतानाच पाचही कामगार तोल जाऊन  टाकीत पडले. टाकीत पडल्यानंतर मोठा आवाज येताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने कामगारांच्या बचावकार्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हे कामगार जलविभाग दुरुस्ती खात्याचे कामगार असल्याचं समोर आलं आहे.हेही वाचा -

दादर पश्चिम स्थानकातील दक्षिण पुलाचा रॅम्प आणि जिने बंद

लोकसभा निवडणुक २०१९: उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून होणार सुरुसंबंधित विषय
ताज्या बातम्या