Advertisement

लोकसभा निवडणुक २०१९: उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून होणार सुरु

अागामी लोकसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्जाची प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. देशाच्या ९१ मतदार संघामध्ये निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुक २०१९: उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून होणार सुरु
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकीकरीता उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. देशातील २० राज्यांमधील ९१ मतदार संघामध्ये निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसंच, राज्यातील सात मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे.


उमेदवारी अर्ज प्रक्रिया

आगामी लोकसभा निवडणुक सात टप्प्यात होणार आहे, तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून देशातील ९१ मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसंच, सोमवार १८ मार्च ते २५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, २६ मार्च रोजी उमेदवारांनी केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असेल त्यांच्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत असेल.


११ एप्रिल रोजी मतदान

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ आणि वाशिम या विदर्भातील सात मतदार संघामध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सात मतदारसंघांपैकी नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर, रामटेक आणि यवतमाळ-वाशिम हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सहा मतदार संघ काँग्रेला दिले असून भंडारा-गोंदिया मतदार संघ राष्ट्रवादीला देण्यात आला आहे.



हेही वाचा -

आगामी लोकसभा निवडणुक मनसे लढणार नाही, मनसेचे स्पष्टीकरण

दादर पश्चिम स्थानकातील दक्षिण पुलाचा रॅम्प आणि जिने बंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा