गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत अाहे. बुधवारी पेट्रोलचा दर प्रती लिटरला ८६.७२ रुपयांवर तर डिझेल प्रती लिटर ७५.७४ रुपये या विक्रमी पातळीवर गेले. इंधनाच्या या दरवाढीने मात्र किचनचं बजेट चांगलंच कोलमडलं अाहे. एकाच दिवसात भाज्यांचे भाव तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून अाले.
डिझेलचे भाव वाढल्याने मालवाहतूकदारांना भाजीपाला वाहतुकीचा दर वाढवावा लागला अाहे. वाहतूक महागल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले अाहेत. वाशी येथील एपीएमसी बाजारात मंगळवारी असलेले दर अाणि बुधवारचे दर यात मोठी तफावत होती. एका दिवसात सर्वच भाज्या २५ ते २० टक्के महागल्या अाहेत. त्यामुळे किचनचं हे वाढलेलं बजेट सावरताना गृहीणींना मोठी काटकसर करावी लागणार अाहे.
भाज्यांचे दर
भाजी प्रति क्विंटल भाव प्रती क्विंटल भाव
(मंगळवार- ४-९-१८) ( बुधवार - ५-९-१८)
१. बटाटा ११०० रुपये १५०० रुपये
२. कांदा ८०० रुपये १००० रुपये
३. फ्लॉवर १५०० रुपये १७०० रुपये
४. काकडी १२०० रुपये १५०० रुपये
५. टोमॅटो ५०० रुपये ६०० रुपये
६. गाजर ८०० रुपये १००० रुपये
७. घेवडा ४२०० रुपये ४३०० रुपये
८. फरसबी २००० रुपये २३०० रुपये
९. सुरण १२०० रुपये १३०० रुपये
१०. कोबी ९०० रुपये ८०० रुपये
हेही वाचा -
जोगेश्वरीपाठोपाठ दिंडोशीतील आरक्षित भूखंडही गेला, चौकशीची स्थायी समितीची मागणी
वांद्रयातील नागरिकांना शाळेसह खेळाचं मैदान मिळणार