पावसामुळं ५० ते ७० टक्के भाज्या कुजल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्याच्या अनेक भागांत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच मोठं नुकसानं झालं आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. या पावसाचा फटका आता भाजीपाल्यांला देखील बसला आहे. भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. चांगला माल कमी असल्यानं बहुतांश भाज्या किरकोळ बाजारात शंभरीपार गेल्या आहेत. तर कांदा देखील ७० रुपयांवर पोहोचला आहे.

भाज्या कुजल्या

मुंबईत बाहेर गावाहून येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावानं विकला जात आहे. भाज्यांची आवक अधिक असली तरी पावसामुळं माल खराब होत आहे. किरकोळ विक्रेते खराब भाजी बाजूला करून उर्वरित माल विक्री करण्यासाठी जास्तीच्या दरानं विकत आहेत.

भाज्यांचे दर (प्रतिकिलो)

भाजी

२७ ऑक्टोबर

सध्या
भेंडी

६० 

८०-१०० 

१२०

कोबी

८० 

१००-१२० 

१२५-१३०

तोंडली

४० 

६० 

८०-१००

पत्ताकोबी

६० 

८० 

१००-१२०

काकडी

४० 

६०-८० 

८०-९०

कांदा

४० 

६० 

७०-७५ 

बटाटा

२५ 

३५ 

३८-४०

फरसबी

६० 

८० 

१००

चवळी

८० 

१०० 

१२०

वांग

४० 

६० 

८०

लाल भोपळा

४० 

६०-८० 

१००

दुधी भोपळा

६० 
८० 

९०-१००

कोथिंबीर

४५ 

६० 

८०

हिरव्या मिरच्या

८० 

१४० 

१८०-२००


हेही वाचा -

११ हजार रुग्णांना एक डॉक्टर देतो वैद्यकीय सेवा

पीएमसी खातेधारकांच्या याचिकांवर सोमवारी सुनावणी


पुढील बातमी
इतर बातम्या