Advertisement

पीएमसी खातेधारकांच्या याचिकांवर सोमवारी सुनावणी


पीएमसी खातेधारकांच्या याचिकांवर सोमवारी सुनावणी
SHARES

पीएमसी बॅंकेतील खातेदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खातेदार व ठेवीदारांना बँकेतून त्यांचेच पैसे काढण्यास निर्बंध घालण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठेवींचं हितरक्षण

मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका करून 'रिझर्व्ह बँकेला असे निर्बंध घालण्याचे कायदेशीर अधिकार नसताना या शिखर बँकेनं चुकीचे आदेश काढले. त्याशिवाय ठेवीदारांच्या ठेवींचं हितरक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं स्वत:च निर्माण केलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडूनही (डीआयसीजीसी) ठेवीदारांना त्यांना हवे तेवढे पैसे मिळण्याच्या दृष्टीनं कायदेशीर पावलं उचलण्यात आले नाहीत', असा आक्षेप नोंदवला आहे.

आदेश बेकायदा

याप्रकरणी आणखी एक याचिक मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, यामध्ये रिझर्व्ह बँकेचे आदेश बेकायदा ठरवून रद्दबातल करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. दरम्यान, या दोन्ही याचिकांवर सोमवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

महा चक्रीवादळ: उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Google Pay अॅपमधून आता चेहरा दाखवून करा पैसे ट्रान्सफर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा