११ हजार रुग्णांना एक डॉक्टर देतो वैद्यकीय सेवा


SHARE

मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शाखेतून शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी हे या शाखेतून उत्तीर्ण होत असले तरी अद्याप एक डॉक्टर ११ हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील सार्वजनिक सेवेतील एक अॅलोपथी डॉक्टर १० हजार ९२६ रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहे.

वैद्यकीय सेवा

याबाबत सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स (सीबीएचआय) या संस्थेनं सर्वेक्षण केलं आहे. त्यांच्या या सर्वेक्षणामध्ये हे अत्यल्प प्रमाण दिसून आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभ्यासामध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या अंतर्गत नोंदणी झालेला एक अॅलोपथी डॉक्टर १० हजार ९२६ रुग्णांना वैद्यकीय सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

डॉक्टरांचं प्रमाण कमी

भारतातील 'आयुष'अंतर्गत नोंदणी झालेल्या डॉक्टरांच्या प्रमाणामध्येही सातत्यानं वाढ होत आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण ७ लाख ७३ हजार ६६८ इतके तर २०१८ मध्ये हे प्रमाण ७ लाख ९९ हजार ८७९ एवढे होते. 'आयुष'कडं सर्वाधिक नोंदणीकृत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांची संख्या ५५.४७ टक्के असून भारतातील होमिओपथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ३६.६९ टक्के आहे. दरम्यान, अॅलोपथी डॉक्टरांचं प्रमाण कमी होत असताना डेन्टिस्टचं प्रमाण मात्र वाढलं आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत हे प्रमाण२ लाख ५४ हजार २८३ इतके नोंदण्यात आलं.


हेही वाचा -

महा चक्रीवादळ: उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

पीएमसी खातेधारकांच्या याचिकांवर सोमवारी सुनावणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या