कलम ३७० रद्द केल्यानंतर विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशातील विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थ्येत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेत सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांवर प्रवाशांसाठी विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. तसंच, नागरी उड्डाण मंत्रालयानं प्रवाशांसोबत येणाऱ्यांसाठी विमानतळाच्या लाउंजमध्ये प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमावली जारी

नागरी विमान सुरक्षा ब्युरोनं दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता लक्षात घेत सर्व विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, विमानतळाच्या आसपास ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांची पूर्ण तपासणी करण्यात येत आहे. ही वाहन पार्किंगमध्ये असो किंवा टर्मिनलच्या बाहेर तसंच, पिक-अप ड्रॉप सेवेसाठी असो या सर्व प्रवाशांची विमानतळात प्रवेश केल्यापासून ते विमानात चढेपर्यंत कडक तपासणी केली जात आहे. त्याशिवाय, व्हिजिटर्सनाही २० ऑगस्टपर्यंत विमानतळावर प्रवेश बंदी घातली आहे.

५ ते ६ तास प्रतीक्षा

या निर्णयानंतर दिल्लीहून लखनऊ, दिल्ली ते जयपूर, दिल्ली ते कोलकाता येथेे जाण्यासाठी सुमारे १ ते सव्वादोन तासांचा वेळ लागतो. मात्र, आयजीआय विमानतळ प्राधिकरणाच्या नव्या विशेष सूचनेनुसार प्रवाशांना एक तासाच्या विमान प्रवासासाठी सुमारे ५ ते ६ तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

लाइव्ह अपडेट्स: राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू

यंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी


पुढील बातमी
इतर बातम्या