Advertisement

यंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी

यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना ५ दिवस सुट्टी शाळा जाहीर करावी आणि कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नये, असे निर्देश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपसंचालकांना दिले आहेत.

यंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी
SHARES

मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. अनेकजण गणेशोत्सवानिमित्त गावी आणि विशेषत: कोकणात जातात. परंतु, या काळात शालेय विद्यार्थ्यांना शाळांना सुट्टी नसल्यामुळं दांडी मारावी लागते. त्याशिवाय अनेक शाळा ऐन गणेशोत्सवामध्ये परीक्षा घेतात. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना ५ दिवस सुट्टी शाळा जाहीर करावी आणि कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नये, असे निर्देश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपसंचालकांना दिले आहेत.

परीक्षा घेण्यास मज्जाव

शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचं तसंच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडं आल्या होत्या. त्यामुळं पालकांच्या या तक्रारी लक्षात घेत आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधीमंडळानं शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी मागणी केली. त्यामुळं आता गणेशोत्सव काळात गावी जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय गणेशोत्सव काळात परीक्षा घेणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही चाप बसेल, अशी माहिती युवासेनेकडून देण्यात आली आहे.

परिपत्रक काढण्याचे निर्देश

उत्सवकाळात परीक्षा घ्यायच्याच नाहीत, अशा सूचना असतानाही शासन आदेश धुडकावला जातो. त्यामुळं अशा शाळांविरोधात शिक्षण विभागानं कडक कारवाई केली करावी, अशी मागणीही युवासेनेनं शिक्षणमंत्र्यांकडं केली. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षण विभागाचे उपसंचालक यांना गणेशोत्सव काळात शाळांना ५ दिवसांची सुट्टी देवून संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी कोणत्याही परीक्षा घेवू नये, असं परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा -

रेल्वे तिकीट आरक्षित करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा