Advertisement

रेल्वे तिकीट आरक्षित करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार

रेल्वे प्रशासनाने आॅनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशाकडून प्रत्येकी २० ते ४० रुपये सेवाशुल्क (Service Charge) आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे तिकीट आरक्षित करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार
SHARES

रेल्वे तिकीट आरक्षित (Ticket Reservation) करण्यासाठी लांबलचक रांगेत तिष्ठत उभं राहण्यापेक्षा बहुसंख्य प्रवासी आॅनलाइन तिकीट बुक करण्याला प्राधान्य देतात. मात्र प्रवाशांच्या सोईसाठी असलेली ही सेवा लवकरच खर्चिक होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने आॅनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशाकडून प्रत्येकी २० ते ४० रुपये सेवाशुल्क (Service Charge) आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

'असे' असतील शुल्क

रेल्वे तिकीट आरक्षणावरील सेवाशुल्क वसुली सुरू झाल्यावर प्रवाशांना स्लीपर क्लाससाठी प्रत्येकी २० रुपये आणि एसी डब्यांसाठी प्रत्येकी ४० रुपये सेवाशुल्क द्यावा लागणार आहे. 

सवलतीला मुदतवाढ

याआधी आॅनलाइन तिकीट बुक केल्यास नोव्हेंबर २०१६ पर्यंत त्यासाठी सेवाशुल्क आकरले जायचे. नोटाबंदीनंतर आॅनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी आॅनलाइन तिकीट बुक केल्यास त्यावरील सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सेवाशुल्कमाफी जून २०१७ पर्यंत देण्याचं आधी ठरवण्यात आलं होतं. परंतु या सवलतीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत होती. 

तोटा वाढला

मात्र सेवाशुल्क रद्द करण्यात आल्याने आयआरसीटीसी (IRCTC)ला तोटा सहन करावा लागत होता. यामुळे केंद्र सरकारने ‘आयआरसीटीसी’ नुकसान भरपाई म्हणून ८८ कोटी रुपये देखील दिले होते. मात्र हा तोटा वाढतच चालल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षणावरील सवलत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा शुल्क पुन्हा सुरू केल्यास ‘आयआरसीटीसी’ला २०० कोटी रुपये मिळू शकतील, असं म्हटलं जात आहे. 



हेही वाचा-

बेस्टवरील आर्थिक संकट लवकरच होणार दूर

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेला २० कोटींचं नुकसान



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा