Advertisement

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेला २० कोटींचं नुकसान

मुसळधार पावसामुळं वाहतूक ठप्प झाल्यानं मध्य रेल्वेला तब्बल २० कोटींचं नुकसान झालं आहे.

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेला २० कोटींचं नुकसान
SHARES

मागील ५ दिवसांपासून मुंबईसह अनेक भागांत पडलेल्या मुसळधार पावासामुळं मध्य रेल्वेचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाचं पाणी रेल्वे रुळांवर साचल्यानं मुंबई-पुणे रेल्वेमार्ग ठप्प असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेनं शनिवारपासून तब्बल १०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या. कर्जत आणि कसारा रेल्वे मार्गावर साचलेलं पाणी, पाणी साचल्यानं वाहून गेलेली खडी आणि रेल्वे रुळांवर कोसळेली दरडी या कारणांमुळं मध्य रेल्वेला लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

प्रवाशांची प्रचंड गर्दी

मुसळधार पावसामुळं वाहतूक ठप्प झाल्यानं मध्य रेल्वेला तब्बल २० कोटींच नुकसान झालं आहे. शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक सिएसएमटी ते कुर्ल्यापर्यंत बंद होती. त्यामुळं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. तसंच, मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत झाल्यानं अनेक गाड्या कर्जत, कल्याण आणि टिटवाळा स्थानकात रद्द करण्यात आल्या होत्या.

वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वे मार्गावरील चुन्नाभट्टी स्थानकातील रुळ पाण्याखाली गेल्यानं लोकलसेवा काही काळासाठी ठप्प होती. दरम्यान, पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानं दुरुस्तीचं काम हाती घेतलं आणि लोकल वाहतूक पूर्वपदावर आणली.



हेही वाचा -

मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मुंबई-नाशिक महामार्ग महिनाभर बंद?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा