Advertisement

मुंबई-नाशिक महामार्ग महिनाभर बंद?

पावसाच्या तडाख्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता कसारा घाटात खचला आहे. हा घाटरस्ता दुरूस्त करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग महिनाभर बंद?
SHARES

गेल्या महिनाभरापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या तडाख्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता कसारा घाटात खचला आहे. हा घाटरस्ता दुरूस्त करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील इतर भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्याचा फटका रेल्वेसह रस्ते वाहतुकीला देखील बसत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

घाटातील रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याने या मार्गावरून वाहन गेल्यास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून या रस्त्याच्या दुरूस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आलं आहे. या कामाला महिनाभर लागू शकतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक किमान महिनाभर बंद राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हा मार्ग बंद केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. 



हेही वाचा-

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप

लोकलवर दगड फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचं लक्ष?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा