लोकलवर दगड फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचं लक्ष?

दगडफेकीवर आणि रेल्वे परिसरात होणाऱ्या अन्य गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी लोकलमधील मोटरमनच्या केबीनमध्ये बाहेरच्या दिशेनं सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन विचारात आहे.

लोकलवर दगड फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचं लक्ष?
SHARES

मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान फटका टोळीकडून लोकलवर दगड फेकली जातात. अनेकदा या दगडफेकीच्या घटनेत प्रवाशांचा मृत्यू झाल असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळं या दगडफेकीवर आणि रेल्वे परिसरात होणाऱ्या अन्य गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी लोकलमधील मोटरमनच्या केबीनमध्ये बाहेरच्या दिशेनं सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन विचारात आहे. याबाबत मध्य रेल्वेनं चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळं आता दगड फेकणाऱ्यांना पकडणं अधिक सोपं होणार आहे.

एका दिवशी ४ घटना

मागील अनेक दिवसांपासून लोकलवर दगड फेकण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनेमध्ये प्रवाशांसह मोटरमनही जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला ते विद्याविहारदरम्यान एकाच दिवशी ४ घटना घडल्या होत्या. तसंच, लोकलच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हाताला फटका मारून त्यांच्याकडील मोबाइल व बॅग लंपास करण्याचेही प्रकार घडले आहेत.

सर्व घटनांना आळा

या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आता मोटरमनच्या केबिनमध्ये बाहेरच्या दिशेनं सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला असून, रेल्वे हद्दीतील गुन्ह्यातील आरोपींची हालचाल टिपण्यात येणार आहे.

तज्ज्ञ कंपन्यांशी चर्चा

लोकलमधील मोटरमनच्या केबीनमध्ये बाहेरच्या दिशेनं सीसीटीव्ही बसवण्यासाठी काही तज्ज्ञ कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. कॅमेरा बसवल्यास त्याची एक महिना चाचणी केली जाणर आहे. रेल्वेच्या हद्दीत येणारा आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यात कुठपर्यंत कैद होऊ शकतो, धावत्या लोकलमध्ये घटना टिपणं शक्य होईल का, अशा तांत्रिक बाबी एका महिन्यात तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, फटका गँग, लोकलवर होणारी दगडफेक त्याशिवाय रेल्वे रूळ व त्या शेजारी होणाऱ्या घटनांना कॅमेऱ्यात कैद करणं हा त्यामागील उद्देश आहे.हेही वाचा -

बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास सक्त मनाई

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप?संबंधित विषय