निवडणुकीत फसवणूक होणार असेल तर मतदान कशासाठी? - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष शुक्रवारी कार्यकरत्यांना संबोधित करणार आहेत. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यगृहात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असून, सर्व पक्षीय नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच शुक्रवारी झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकरत्यांना संबोधित केलं. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यगृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून 'निवडणुकीत फसवणूक होणार असेल तर मतदान कशासाठी?', असा सवाल विचारला आहे.


लाईव्ह अपडेट्स:

 • महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू
 • पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं संबोधन
 • राज ठाकरे यांची गिरीष महाजन यांच्यावर टीका
 • हे कसेही वागले तरी यांनाच मतदान होणार - राज
 • सर्वांच्यांच मनात पुढे काय होणार अशी धाकधूक - राज
 • काही फरक पडत नाही अशी सरकारची वृत्ती झाली आहे - राज
 • इव्हीएमच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट
 • फसवून निवडणूक जिंकत असेल तर त्याला विरोध - राज
 • ईव्हीएममधील ५४ लाख मतदानाचा फरक आलाय
 • आरटीआय मध्ये फेरबदल का करण्यात आले?
 • ३७१ मतदारसंघात घोळ घातले त्याच काय?
 • अधिकाऱ्यांचा कार्यकाळ आणि पगार आता केंद्र ठरणार - राज
 • मोदींची माहिती देणाऱ्या एका अधिकाऱ्याला हटवण्यात आलं - राज
 • मोदी बी. ए. पास आहेत की नाही यावरून सुडनाट्य सुरू
 • अशा स्थितीत माहिती अधिकारी सरकारचे बाहुलं होणार - राज
 • याचाच अर्थ यापुढे तुम्हाला माहिती मिळणार नाही - राज
 • युपीए कायद्याची देशाला गरज नसताना, देशावर लादला - राज
 • युपीए कायद्याचा गैरवापर होत आहे - राज
 • उद्या कुणीही राजकीय आंदोलन केलं तरी तुम्ही दहशतवादी? - राज
 • हा सगळा उन्माद सुरू आहे, तो ही बहुमताच्या जोरावर - राज
 • उद्या उचलून कोणाला जेलमध्ये टाकायचं हे शाह ठरवणार? 
 • स्थानिक सुरक्षा यंत्रणांना विचारण्याची गरज का नाही?
 • देशातल्या उद्योग धद्यांचा बॅंड वाजला आहे - राज
 • गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेकारी भारतात - राज
 • वाहन निर्मित क्षेत्रामध्ये अभुतपूर्व मंदी आली - राज
 • महाराष्ट्रात दीड लाख देशात ६ लाख कंपन्या बंद - राज
 • गेल्या वर्षी याच मंचावरून केलेले दावे खरे ठरले - राज
 • निवडणुकीत फसवणूक होणार असेल तर मतदान कशासाठी?
 • महाराष्ट्रात ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या - राज
 • नमो नमोचा जप करणाऱ्यांना आज कळणार नाही - राज
 • भक्तांच्या घरावर टक टक झाल्यावर कळेल - राज
 • कधीकाळी भक्त असलेल्यांचा आत भ्रमनिरास होतोय - राज


सेना-भाजपवर निशाणा

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सभांमध्ये भाजप-शिवसेना पक्षावर निशाणा साधल. सर्व मतदारांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निवडून न आणण्याचं आवाहन केलं होतं. 

ईव्हीएमविरोधात लढा

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर राज ठाकरे यांनी मतदान घेण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनविरोधात सवाल केला होता. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय संबोधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

यंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी

बेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या