घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोप्रवास उशिरापर्यंत करता येणार

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मेट्रोची वेळ वाढवण्यात आल्यामुळे मुंबईकरांना आणखी उशीरापर्यंत मेट्रोनं प्रवास करता येणार आहे.

नव्या वेळापत्रकानुसार (Mumbai Metro New Timings) वर्सोवावरुन सुटणारी शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता असणार असून घाटकोपरवरुन शेवटची मेट्रो आता ११ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे.

तर दोन्ही स्थानकांवरुन सकाळी सुटणारी पहिली मेट्रो ६ वाजून ३० मिनिटांनीच सुटणार आहे. मुंबई मेट्रोनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

घाटकोपर ते वर्सोवा या दोन्ही स्थानकांवरून सुटणारी मेट्रो सकाळी ६ वाजून ३० मिनिटांचीच होती. पण वर्सोवावरून १० वाजून ३० मिनिटांनी शेवटची मेट्रो सुटत होती. तर घाटकोपरवरुन १० वाजून ५५ मिनिटांनी शेवटची मेट्रो होती.

आता या दोन्ही वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी १६ ऑक्टोबर, २०२१ रोजी शेवटचा वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.


हेही वाचा

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर उभारण्यात येणार सर्वात मोठा बोगदा

एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या