Advertisement

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर उभारण्यात येणार सर्वात मोठा बोगदा

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पनवेल ते कर्जत प्रवास सोपा होणार आहे. पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्पांतर्गत या मार्गावर बोगदा उभारण्यात येणार आहे.

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर उभारण्यात येणार सर्वात मोठा बोगदा
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पनवेल ते कर्जत प्रवास सोपा होणार आहे. पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्पांतर्गत या मार्गावर बोगदा उभारण्यात येणार आहे. 'वावर्ले' असं या बोगद्याचं नावं असून, हा बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) हा बोगदा उभारण्यात येणार आहे. तसंच, महामुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस त्याचे काम सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि कल्याण स्थानकांतील गर्दी मोठ्या प्रमाणात विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत येणाऱ्या पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्पात एकूण ३ बोगदयांची उभारणी करण्यात येणार आहे. नढाल, किरवली आणि वावर्ले असे ३ बोगदे उभारण्यात येणार आहेत. या तिन्ही पुलांची रुंदी १४ मीटर आणि उंची ७.५० असणार आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे.

यातील वावर्ले बोगदा २.६ किमी लांबीचा आहे. वावर्ले बोगद्यामधून दोन रेल्वे मार्गिका जाणार आहेत. बोगदा उभारण्यापूर्वीची कामे सध्या सुरू आहेत. पनवेल-कर्जत उपनगरी मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वे प्रवाशांच्या वेळेत आणि प्रवासखर्चात मोठी बचत होणार आहे.

या बोगद्या व्यतिरिक्त कर्जतजवळ १२२५ मीटर आणि पनवेललगत १३७५ मीटरचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर लहान-मोठे असे एकूण ४४ पूल असतील. रूळ ओलांडणी टाळण्यासाठी एक पादचारी पूलदेखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले असून एप्रिलअखेर संपूर्ण भूसंपादन करण्याचे लक्ष्य आहे.

पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग

  • स्थानके -  पनवेल, चिखले, मोहापे, चौक, कर्जत
  • रेल्वे मार्गिकांची एकूण लांबी- ३० किमी
  • उड्डाणपूल- २
  • बोगदे- ३
  • पूल- ४४ (८ मोठे पूल, ३६ लहान पूल)
  • आरओबी/आरयूबी- ५ रोड ओव्हर ब्रिज, १५ रोड अंडर ब्रिज
  • रूळ ओलांडणीसाठी एक पादचारी पूल
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा