Advertisement

एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय

एसटी महामंडळानं नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नाही, असं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय
SHARES

एसटी महामंडळानं नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नाही, असं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. विलीनीकरणासंदर्भात नुकताच सादर झालेल्या ३ सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळं प्रतीक्षा यादीवरील २,२०० कर्मचाऱ्यांचंही दरवाजे बंद झालं आहेत.

एसटी महामंडळ जोपर्यंत फायद्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नसल्याचं म्हटलं. त्याचा कालावधी किती असेल हे सांगणे कठिण असल्याचं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलं. एसटीच्या २,२०० चालक कम वाहकांच्या भरती प्रक्रियेवरही अद्याप स्थगिती असून त्याबद्दलही विचारले असता त्यांचाही विचार करण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट केलं. संप मिटला आणि कर्मचारी कामावर परतल्यास प्रतीक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना घेतल्यानंतर पुन्हा त्याचा आणखी भार महामंडळावरही येईल. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या भरतीही तुर्तास होणार नसल्याचे सांगितले.

मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. एसटी महामंडळाला २०२०-२१ मध्ये ४ हजार १३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. तर खर्च ५ हजार ८६६ कोटी रुपये होता. तर संचित तोटा ७ हजार ९९ कोटी रुपये झाला. २०२१-२२ मध्ये ६ हजार ८९० उत्पन्न असून १० हजार १९८ खर्च झाला आहे. त्यामुळं संचित तोट्यातही तेवढ्याच प्रमाणात वाढ झाली आहे.

मागील ६ ते ७ वर्षांत संचित तोट्यात वाढच होत गेली. यामध्ये कोरोनामुळं उत्पन्नावर परिणाम होतानाच मागील ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळं मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. नुकसान, तोटा यामुळं कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला शासनाकडूनच मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून राहावे लागले. त्याचा परिणाम महामंडळाच्या भरती प्रक्रियेवरही झाला.

विलीनीकरणाच्या मागणीनंतर नेमलेल्या तीन सदस्य समितीचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि खर्चात कपात करण्यासाठी नियोजन सादर केले आहे. खर्च कपातीमध्ये नवीन बस खरेदी करताना त्या सीएनजी इंधनावर घेणे, भाडेतत्त्वावर नवीन बसचा समावेश करणे यासह महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचे नियोजन केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा