मुंबई शहराचं पाणी महागणार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील (mumbai) पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) तयार केला आहे.

मुंबईत 6 ते 7 टक्के पाणी पट्टी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीने सर्वसामान्य होरपळत असतानाच हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांचा दर महिन्याचा पाण्याचा खर्चही वाढणार आहे.

जलवाहिन्यांची देखभाल, शुद्ध पाणीपुरवठयावर जल विभागाच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

त्यामुळे पाणी पट्टीत 6 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. याबाबत आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांबरोबर चर्चा झाली आहे.

पाणीपट्टीत वाढ करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. पण, सध्याच्या मनपाने पाणी कपात केली आहे. या काळात पाणीपट्टी वाढवल्यास जनतेत रोष निर्माण होईल, या भीतीने भाजपने पाणीपट्टी वाढीला विरोध केला आहे.

येत्या पावसाळ्यात धरणे अर्धी भरल्यानंतर पाणी पट्टीत वाढ करण्याचे प्रशासनाने ठरवल्याचे कळते. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नाही.‌

मनपाचा खर्च वाढला असून तो लक्षात घेता ही वाढ करणे गरजेचे असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले.

मुंबईला 120 किलोमीटर अंतरावरुन जल वाहिन्याद्वारे पाणीपुरवठा होतो. जल वाहिन्यांची देखभाल, पाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध करणे आदींवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो.

तसेच त्यामुळे मुंबई मनपाने आर्थिक गणित जुळवण्यासाठी यंदा वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

याबाबतचा पाणीपट्टी (water charge) वाढीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात आला असता महापौर रितू तावडे यांनी त्याला स्थगिती दिली होती.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या वाढीविरोधात आवाज उठवल्यावर वाढ होणार नाही असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभागृहात म्हटले होते. त्यामुळे पाणीपट्टीतील वाढ टळली होती.‌


हेही वाचा

मुंबईतील 147 ‘गार्बेज व्हल्नरेबल’ ठिकाणांवर BMCची कारवाई

फेरीवाल्यांसाठी QR कोडयुक्त परवाने सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या