माझगावमध्ये जलवाहिनी फुटून रस्ता खचला

माझगाव येथील भंडारवाडा जलाशयाजवळ हुतात्मा पटेल चौकामध्ये शुक्रवारी दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याच्या दाबामुळे ती फुटून येथील रस्ता उखडला गेला. यामध्ये हजारो लिटर पाणी वाहून गेलं अाहे.  रात्री उशिरापर्यंत गळती शोधून दुरुस्तीचं काम युध्दपातळीवर पूर्ण होणं अपेक्षित असल्याचा विश्वास महापालिकेच्या जलअभियंता विभागानं व्यक्त केला अाहे.

शनिवारी पुरवठा सुरळीत

माझगाव येथील परिसरात दुपारी ३ ते ५ या वेळेत पाण्याचा पुरवठा केला जातो. याच कालावधीत भंडारवाडा जलाशयाच्या जवळील चौकात सुमारे ६०० मि.मी व्यासाची जलवाहिनी फुटली.  पाण्याच्या दाबानं येथील रस्ताच उखडून खचला गेला आहे. महापालिकेचे जलअभियंता दिनेशचंद्र तवाडिया यांनी सांगितलं की, ही घटना दुपारची असून युध्द पातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात अालं अाहे. जलवाहिनी फुटल्यानंतर त्वरीत मुख्य पाणी पुरवठा बंद करण्यात आला अाहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम रात्रीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यामुळे शनिवारी या भागाला सुरळीत पाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा - 

भाजपाचे ४ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक होणार बाद

राणी बागेतील ७ दिवसांच्या पेंग्विनचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या