SHARE

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतात जन्माला आलेल्या पहिल्यावहिल्या पेंग्विनच्या पिल्लाचा बुधवारी मृत्यू झाला. हम्बोल्ट पेंग्विनचं व्यवस्थापन करणाऱ्या पशुवैद्यकीय पथकाने यासंबंधीची अधिकृत माहिती शुक्रवारी सायंकाळी दिली.  


भारतातील पहिलं पेंग्विंन

दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या सेऊलमधून मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ३ नर आणि ५ मादी पेंग्विन आणण्यात आले होते. त्यानंतर या पेंग्विनना पाहण्यासाठी मुंबईकरांनी चांगलीच गर्दी केली होती. २ वर्षापासून मुंबईच्या वातावरणात रमलेल्या ८ पेंग्विनपैकी मोल्ट आणि फ्लिपर या जोडीनं ५ जुलैला अंड दिलं होतं. 

पेंग्विनने अंडे दिल्यानंतर ४० दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. हा इन्क्युबेशन पिरिएड १४ ऑगस्ट रोजी संपला आणि १५ ऑगस्ट रोजी रात्री अंड्यातून पिल्लू बाहेर पडलं. हे पिल्लू सुखरुप बाहेर पडल्याने आई फ्लिपर आणि बाबा मोल्टदेखील खूश होते. नवजात पिल्लू अगदी चुणचुणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. 


अचानक प्रकृती खालावली

या पेंग्विनची योग्य काळजी घेण्यात येत असतानाही २२ ऑगस्टला पेंग्विनच्या पिल्लाची प्रकृती खालावली. त्याच दिवशी रात्री नवजात पिल्लू मृतावस्थेत आढळलं. त्यानंतर २३ तारखेला सकाळी ९.३० च्या सुमारास मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ञ विभागातील प्राध्यापकांच्या पथकानं या पिल्लाचं शवविच्छेदन केलं. 


मृत्यू कशामुळे?

हे पिल जन्माला आलं होतं तेच विकलांग होतं. शरीरातील अंतर्गत अवयवांची पूर्ण वाढ झालेली नव्हती. तसंच फुफ्फुसाला काही अंशी सुजही दिसून आली होती. याशिवाय अन्न साठवून व टिकवून ठेवण्याची जी पिशवी होती, त्यातही काही दोष होता. त्यामुळे याचा परिणाम सर्व अवयवांवर होऊन या पिलाचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं.जन्मलेल्या पिलाचे डोळे हे साधारणत: दहा दिवसांनी उघडले जातात. परंतु आठ दिवसांमध्ये या पिलाचे डोळेही उघडले नव्हते. अधूनमधून मोल्ड आणि फ्लिपर हे जोडीदार आपल्या या पिलाची काळजी घेत असतं. अधुनमधून या पिलाला चोचीनं काही भरवण्याचाही प्रयत्न करत असत. त्यामुळे त्याचं काहीसं वजनही वाढलं होतं. 

 -  डॉ. अनिल त्रिपाटी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानहेही वाचा-

गुड न्यूज, राणीबागेत छोट्या पेंग्विनचं आगमन

पेंग्विनचं 'ते' पिल्लू पुढील दोन महिने राहणार घरट्यातचसंबंधित विषय
ताज्या बातम्या