Advertisement

गुड न्यूज, राणीबागेत छोट्या पेंग्विनचं आगमन

राणीबागेत आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. मोल्ट आणि त्याची जोडीदार फ्लिपर यांनी मागील ५ जुलैला अंडे दिले होते. त्याचा ४० दिवसाचा अवधी पूर्ण झाल्यावर बुधवारी या पिल्लाचा जन्म झाला.

गुड न्यूज, राणीबागेत छोट्या पेंग्विनचं आगमन
SHARES

खूशखबर....खूशखबर....खूशखबर...राणीबागेत आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. ज्याची आपण आतुरतेने वाट पहात होतो, त्या पेंग्विननं बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान एका पिल्लाला जन्म दिला. मोल्ट आणि त्याची जोडीदार फ्लिपर यांनी मागील ५ जुलैला अंडे दिले होते. त्याचा ४० दिवसाचा अवधी पूर्ण झाल्यावर बुधवारी या पिल्लाचा जन्म झाला.


२०१६ मध्ये आणले पेंग्विन

भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात(राणीबाग) दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. यामध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विन होते. त्यापैकी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी यातील एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सात पेंग्विन हे या पिंजऱ्यात आनंदाने राहत होते.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

हम्बोल्ट पेंग्विन कक्षात सध्या सात पेंग्विन आहेत. यातील डोनाल्ड-डेझी, ऑलिव्ह-पॉपाया, मिस्टर मोईट-फ्लिपर या तीन जोड्या तयार झाल्या आहेत. यातील मिस्टर मोल्ट आणि फ्लिपर मादी यांच्या वागण्यात काहीसा बदल झाल्यानंतर मागील महिन्यात फ्लिपर मादीने अंडे दिले होते. त्यामुळे नव्या पाहुण्याची चाहूल लागली होती. परंतु, गुरुवारी याची खरी आनंदाची बातमी मुंबईकरांना मिळाली. भारतात पेंग्विनचा जन्म होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.


हेही वाचा -

हॅप्पी बर्थडे मिस्टर मोल्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा