रेस्टॉरंट्समध्ये जेवल्यानं कोविड -१९ पसरण्याचा धोका अधिक असतो का?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता मुंबईत अंक्षत: निर्बंध शिथुल करण्यात आले आहेत. याअंतर्गत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवणं धोकादायक ठरू शकतं अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.

“रेस्टॉरंट्स ही एकमेव अशी जागा आहे जिथं तुम्हाला मास्क काढावा लागतो. त्यामुळेच बऱ्याच शहरांमध्ये रेस्टॉरंट्सवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, ” असं महाराष्ट्राच्या कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी म्हणाले.

सध्या, रेस्टॉरंट्स आठवड्याच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खिली राहतील. पहिल्या लॉकडाऊननंतर, रेस्टॉरंट्सनं त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. डिजिटल फूड मेनू, सुटसुटित आसन व्यवस्था, टेबलांमधील अंतर अशा काही उपाययोजना अमलात आणल्या. पण एक महत्त्वाची गोष्ट बदलली नाही ती म्हणजे एअर कंडिशनर.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे (आयआयटी-बी)मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक रजनीश भारद्वाज म्हणाले, “वातानुकूलित जागेत तीच हवा बंद जागेत फिरत राहते. या हवेतील कणांची एकाग्रता जास्त आहे, ज्यामुळे ते धोकादायक बनते.

भारद्वाज यांच्या मते, बंद, “वातानुकूलित खाण्याच्या जागा संसर्ग पसरण्याचा उच्च धोका बाळगतात. जोखीम वातानुकूलित नसलेल्या, हवेशीर जागांमध्ये किंचित कमी होऊ शकते आणि ते खुल्या हवेच्या जागेत आणखी कमी होते. आपण हे विसरू नये की जेव्हा कोणी मास्क घालत नाही आणि व्हायरस हवेत असेल तर नेहमीच धोका वाढतो. ”

जर्नल ऑफ कुरियन मेडिकल सायन्समध्ये २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे की, जर एखाद्या इनडोअर सेटिंगमध्ये संक्रमित व्यक्तीकडून थेट हवेचा प्रवाह असेल तर २ मीटर (6 फूट) पेक्षा जास्त अंतरावर व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी असं म्हटलं आहे की घराबाहेर आणि चांगल्या हवेशीर जागांमध्ये व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी होतो.


हेही वाचा

समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक– राजेश टोपे

नवी मुंबई पालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबने वर्षात केल्या ४.५ लाख चाचण्या

पुढील बातमी
इतर बातम्या