Advertisement

समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक– राजेश टोपे

कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचं शस्त्र असून समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणं काळाची गरज आहे.

समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक– राजेश टोपे
SHARES

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सहभागासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. जाणीवजागृती बरोबरच नागरिकांचे समुपदेशन करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशीर जोशी, गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला, सर्च संस्थेचे विश्वस्त डॉ.आनंद बंग, डॉ.हर्षा वशिष्ठ आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा- ओबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना, घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या भागात जाणीवजागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई संस्था प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून त्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी आणि आरोग्यविषयक गावांना सक्षम करण्यासाठी आरोग्य स्वराज्य योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचं शस्त्र असून समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणं काळाची गरज आहे. जागतिकस्तरावर देखील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे, तिथं तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवल्याचं दिसून येतं. त्यामुळे लसीकरण प्रभावी असून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचंं समुपदेशन करतानाच त्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा– अशोक चव्हाण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा