मुंबईच्या झेन सदावर्तेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ( दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (मानकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. मुंबई (mumbai) ची झेन सदावर्ते ( व औरंगाबाद (चा आकाश खिल्लारे (akash khillare) यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी (देशभरातून २२ मुलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १० मुली तर १२ मुले असून एका बालकाला मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणाऱ्या बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार सहा श्रेणींमध्ये देण्यात येतो. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

झेन सदावर्ते (ही मुंबई उच्च न्यायालयातील (bombay high court) अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे. मुंबईतील हिंदमाता परिसरात २२ ऑगस्ट २०१८ रोजी क्रिस्टल टॉवर ( इमारतीला आग  (fire) लागली. या आगीत ४ जण मृत्यूमुखी पडले. तर १८ जण जखमी झाले. या आगीतून झेन हिने प्रसंगावधान दाखवत १७ जणांचा जीव वाचवला. या धाडसामुळे झेन चर्चेत आली होती. झेन आपल्या कुटुंबासोबत क्रिस्टल टॉवरच्या १६ व्या मजल्यावर राहते. या इमारतीला आग लागली तेव्हा झेनने घाबरुन न जाता घरातल्यांना शांत केले.  सुती कापड ओले करुन ते नाकाला धरुन श्वास घेण्यास सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांसह इतरांचे प्राण वाचले. झेन डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आहे.

शाळेत शिकवलेल्या आपत्ती व्यवस्थापनातील प्रशिक्षणाचा उपयोग केला होता. आगीमुळे ऑक्सिजन (चं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढते. त्यावेळी गुदमरून मृत्यू होऊ शकतो. तोंडावर ओलं कापड ठेवल्यास श्वास घ्यायला त्रास होत नाही, या माहितीचा उपयोग करून तिने इतके प्राण वाचवले होते. 

औरंगाबादच्या आकाश खिल्लारे (akash khillare) याने ७० फूट नदीत (river) बुडणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेसह तिच्या आईला वाचवले. ती महिला मुलीला घेऊन नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मुलगी नदीत पडली. तिला वाचवण्यासाठी महिलेनेही नदीत उडी मारली. दोघीही बुडायला लागल्या. औरंगाबाद येथील हातमळी या छोट्याशा गावात राहणारा आकाश यावेळी शाळेला निघाला होता. या वेळी त्याने इतर कोणताही विचार न करता थेट नदीच्या डोहात उडी घेतली आणि बुडत असलेल्या 'त्या' मायलेकीला वाचवले.


हेही वाचा -

धारावी पुनर्विकास : म्हाडाकडून सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा मंजुरी

फास्टॅगच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त नाहीच


पुढील बातमी
इतर बातम्या