फास्टॅगच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त नाहीच

'फास्टॅग'च्या अंमलबजावणीसाठी १५ जानेवारीपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत देखील उलटली. परंतु, ही सुविधा कार्यान्वित होण्यास महिनाअखेर उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

SHARE

टोल नाक्यांवरील टोलवसुलीत पारदर्शकता यावी व टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारनं टोलवसूलीसाठी 'फास्टॅग' (Fastag) ही यंत्रणा बंधनकारक केली. त्यानुसार, या 'फास्टॅग' यंत्रणेची अंमलबजावणी अद्याप मुंबईच्या वेशीवरील तसंच, वांद्रे-वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea-Link) झालेली नाही. 'फास्टॅग'च्या अंमलबजावणीसाठी १५ जानेवारीपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत देखील उलटली. परंतु, ही सुविधा कार्यान्वित होण्यास महिनाअखेर उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्व टोल नाक्यांवर १ जानेवारीपूर्वी फास्टॅगची यंत्रणा बसविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Roads Development Corporation) संबंधितांना दिले होते. मात्र, यावेळी देखील १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. या सर्व मुदतवाढीनंतरही मुंबईच्या वेशीवर अजूनही फास्टॅग (Fastag) यंत्रणा कार्यरत झालेली नाही.

फास्टॅग यंत्रणेची अद्याप चाचणी (Test) सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ऐरोली टोल प्लाझा (Aeroli Toll Plaza) इथं चाचणी सुरू असून, बुधवारपासून वांद्रे-वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea-Link) चाचणी सुरू होणार आहे. इतर नाक्यांवर चाचणी पूर्ण झाल्यावर या महिनाअखेपर्यंत फास्टॅग यंत्रणा सर्वत्र कार्यरत होणार आहे.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या ५ ठिकाणी टोल नाके (Toll) आहेत. या सर्व ठिकाणी फास्टॅग यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचशिवाय, वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोल नाक्यावरदेखील फास्टॅग यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

चाचणीसाठी प्रत्येक टोल नाक्यावर किमान २-३ दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळं जानेवारी अखेपर्यंत मुंबईच्या वेशीवर सर्वत्र फास्टॅग कार्यरत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आणि वाहतूकदारांच्या संघटनांनी (Traffic organizations) मुंबईच्या टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्याची मागणी महामंडळाकडं केल्याचं समजतं.

देशातील राष्ट्रीय महामार्गांवर (National highway) असणाऱ्या टोलनाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (National Highway Authority) याआधी दिलेल्या निर्देशांनुसार फास्टॅग लागू झाल्यानंतर सर्व टोलनाक्यांवर रोखीनं टोल रक्कम भरण्यासाठी केवळ एकच मार्गिका सुरू ठेवण्यात येणार होती. या मार्गिकेतून जाणाऱ्या चालकांना फास्टॅग न लावल्याबद्दल दुप्पट टोल द्यावा लागणार होता.हेही वाचा -

‘शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच ती वेळ’

राज्यभरात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहरसंबंधित विषय
ताज्या बातम्या