Advertisement

‘शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच ती वेळ’

मनसेचं पहिलं महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगाव इथं होत आहे. या निमित्ताने मनसेने पक्षाच्या ध्येय-धोरणात मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच योग्य वेळ असल्याचं आवाहन मनसेने शिवसैनिकांना केलं आहे.

‘शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच ती वेळ’
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (mns) पहिलं महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगाव इथं होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने मनसेने पक्षाच्या ध्येय-धोरणात मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. याच बदलाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच योग्य वेळ असल्याचं आवाहन पक्षाकडून कडव्या शिवसैनिकांना (shiv sainik) करण्यात आलं आहे. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या दिवशी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार पक्षाकडून करण्यात येणार आहे. या दिवशी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिपदर्शन केलं जाणार आहे. 

हेही वाचा- कोणता झेंडा घेणार हाती?

शिवसेनेने हिंदुत्ववादी (hindutva) विचारसरणीच्या भाजपची साथ सोडून धर्मनिरपेक्ष (secular) विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi) स्थापन केलं आहे. तेव्हापासून हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून शिवसेनेवर लावला जात आहे. सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून संसदेत मतदानावेळी शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती. तर वीर सावरकरांच्या (veer sarvarkar) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून टीका-टिपण्णी झाल्यावर कोणती भूमिका घ्यायची याचा गोंधळही पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसून येतो. 

अशा स्थितीत महाराष्ट्रातील विविध निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणाऱ्या मनसेला हिंदुत्ववादी विचारसणीच्या वाटेवर चालण्यासाठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. हिंदुत्ववादी विचारणीची कास धरल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साह परतून भविष्यात भाजपसोबत (bjp) युती करण्याची संधीही मनसेला मिळू शकते. यामुळेच शिवसेना (shiv sena) नेतृत्वाच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांना आकर्षित करण्यासाठी मनसेने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. भाषिक अस्मिता आणि हिंदुत्व या मुद्द्यांना हात घालून कडव्या शिवसैनिकांना आपल्या वळवता येतील, असा विश्वास मनसेच्या पक्षनेतृत्वाला वाटत असल्यानेच या शिवसैनिकांना ‘मन’से आवाहन करण्यात येत आहे.

मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी आपल्या ट्विटरवर एक ट्विट करून शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी… असं म्हणत महाविकास आघाडीला खोपकर यांनी खिचडीची उपमा दिली आहे.

हेही वाचा- देशात सध्या फक्त ‘मोदी लिपी’, राज ठाकरेंचा मिश्कील टोमणा

पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…

निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ

मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ

बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा...

असं, म्हणत कडव्या शिवसैनिकांना मनसेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन खोपकर यांनी केलं आहे. 

गोरेगाव इथं होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत. मराठीच्या मुद्द्यासोबतच ते भाजपला सोयीची अशी हिंदुत्वाची भूमिका घेतील का? पक्षाचा झेंडा भगवा होईल का? याविषयी सध्या राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा