रोहित शर्मा यो-यो टेस्टमध्ये 'पास'!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही दौऱ्यासाठी जाताना यो-यो फिटनेस टेस्ट पार करणं बंधनकारक असताना मुंबईकर रोहित शर्माला दोनदा संधी देऊनही त्याला हा अडथळा पार करता अाला नव्हता. अखेर बुधवारी बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये यो-यो फिटनेस टेस्टसाठी असलेला १६:१ गुणांचा फाॅर्म्युला यशस्वीपणे पार करत रोहित शर्माने अापली लंडनवारी निश्चित केली अाहे. अाता विराटसेनेसोबत तो २३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार अाहे.

दोनदा अपयशी

परदेशात सुट्टीसाठी गेल्याने रोहित शर्मा १५ जून रोजी पहिल्यांदा यो-यो फिटनेस टेस्टला सामोरा गेला. मात्र या तंदुरुस्त चाचणीत तो फेल ठरला. अखेर त्याच्या विनंतीवरून बीसीसीअायनं त्याला दुसरी संधी दिली. मात्र मंगळवारी होणाऱ्या फिटनेस टेस्टसाठी तो हजर राहिला नाही. अाता बुधवारी झालेली यो-यो फिटनेस टेस्ट अापण पार केल्याचं रोहित शर्मानं अापल्या इंस्टाग्राम पेजवर म्हटलं अाहे.

 

रहाणेचं काय होणार?

रोहित शर्मा जर या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला तर त्याच्या जागी मुंबईच्याच अजिंक्य रहाणेला वनडे अाणि टी-२० सामन्यांसाठी सज्ज राहायला सांगितलं होतं. मात्र अाता रोहित शर्मा यो-यो फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यामुळे रहाणेचं काय होणार, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला अाहे. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, तीन वनडे अाणि पाच कसोटी सामने खेळणार अाहे.


हेही वाचा -

रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?

पुढील बातमी
इतर बातम्या