Advertisement

रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित


रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीअाय) सर्व खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट पार करणं बंधनकारक केलं अाहे. अंबाती रायडू या टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाता येणार नाही. अाता रोहित शर्माच्या फिटनेसविषयीही साशकंता निर्माण झाल्याने त्याची लंडनवारी धोक्यात येण्याची शक्यता अाहे. भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला सज्ज होण्यास सांगितल्यामुळे त्याच्या अाता इंग्लंड दौऱ्याच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत.


दोनदा यो-यो टेस्टला अनुपस्थित

सर्व खेळाडूंची यो-यो फिटनेस टेस्ट म्हणजेच शारीरिक तंदुरुस्ती चाचणी शुक्रवारीच पार पडली. पण रोहित शर्मा परदेशात सुट्टीसाठी गेल्यामुळे त्याची तंदुरुस्ती चाचणी रविवारी बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत होणार होती. मात्र रविवारीही तो या चाचणीला हजर राहू शकला नाही. त्याने विनंती बीसीसीअायने मान्य केल्यावर मंगळवारी यो-यो टेस्ट घेण्याचं ठरलं होतं. अखेर मंगळवारीही तो अनुपस्थित राहिला. अाता बुधवारी त्याची अखेरची यो-यो टेस्ट होणार अाहे.


भारतीय संघात निवड झालेल्या प्रत्येकाला यो-यो या तंदुरुस्ती चाचणीतून जावंच लागणार अाहे. जे खेळाडू तंदुरुस्त असतील, त्यांनाच इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली जाईल. त्यामुळे खेळाडूंची द्विधा मनस्थिती झाली असून पुन्हा-पुन्हा यो-यो टेस्ट घेेतली जाणार नाही.
- बीसीसीअायचे पदाधिकारी


अायपीएलमध्ये दोनदा 'फेल'?

बुधवारी होणाऱ्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये जर रोहित शर्मा अपयशी ठरला तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. विशेष म्हणजे, अायपीएलदरम्यान घेण्यात अालेल्या यो-यो टेस्टमध्ये रोहित शर्मा दोन वेळा नापास झाला होता, असंही वृत्त अाहे. त्यामुळेच रोहित शर्माच्या जागी रहाणेला सज्ज होण्यास सांगण्यात अाले अाहे.


तर रहाणेला संधी

रोहित शर्मा जर या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला तर त्याच्या जागी मुंबईच्याच अजिंक्य रहाणेला वनडे अाणि टी-२० संघात संधी मिळू शकते. भारतीय संघ अायर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार अाहेत. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, तीन वनडे अाणि पाच कसोटी सामने खेळणार अाहे.


हेही वाचा -

क्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा