Advertisement

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?


अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?
SHARES

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याचे ग्रहतारे सध्या फिरले अाहेत. खराब फाॅर्ममुळे अजिंक्य रहाणेला संघातील अापली जागा गमवावी लागली अाहे. इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे मालिकेत त्याला स्थान मिळू शकले नाही. पण बुधवारी अापला ३०वा वाढदिवस साजरा करत असतानाच भारताचा कर्णधार विराट कोहलीचा मॅसेज अाला अन् रहाणेच्या अानंदाला पारावार उरला नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी तुझी संघात निवड पक्की, असे संकेत विराट कोहलीनं या शुभेच्छापर संदेशातून रहाणेला दिले.


काय म्हणाला कोहली?

भारतीय संघाच्या परदेशी दौऱ्याला अाता कुठे सुरुवात झाली अाहे. अाणि परदेशात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मी शुभेच्छा देत अाहे. हॅप्पी बर्थडे रहाणे. अशाच महत्त्वपूर्ण खेळी खेळत रहा, असं ट्विट कोहलीनं करत इंग्लंड दौऱ्यासाठी रहाणेच्या निवडीचे संकेत दिले अाहेत.


परदेशात रहाणेचा जलवा

इंग्लंड अाणि अाॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी रहाणे हा भारताचा महत्त्वाचा फलंदाज समजला जात अाहे. मायदेशापेक्षा परदेशात रहाणेनं चांगली कामगिरी केली अाहे. २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून रहाणेने परदेशात ५२.०५ च्या सरासरीने १८७४ धावा फटकावल्या अाहेत. मायदेशात त्याची कामगिरी ३३.६३ च्या सरासरीसह १००९ धावा इतकी राहिली अाहे.


हेही वाचा -

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व

विराट माणूस अाहे मशीन नाही - शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं

अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा